आयुर्वेदनुसार दूध-फळं एकत्र खाऊन नयेत, कारण..

दुधात मिसळू नका हे पदार्थ. पाहा काय परिणाम होतो. 

मिल्कशेक असो वा स्मूदी आपण फळे व दूध हे दोन्ही पदार्थ एकत्र करुन खातो. चवीला ते मस्तच लागतात. फ्रुट सॅलेड तर आपण पौष्टिक समजून खातो. 

मात्र आयुर्वेदात फळे आणि दूध हे मिश्रण विरुद्ध आहार असल्याचे सांगितले आहे. आयुर्वेदानुसार फळे खाल्यावर दूध असलेले पदार्थही खाऊ नयेत. दोन्ही मिक्स करणे तर नक्कीच चांगले नाही. 

 दूध हे स्निग्ध असते आणि फळांमध्ये आम्ल असते. हे दोन्ही गुणधर्म एकजीव करणे आरोग्यासाठी चांगले नाही असे आयुर्वेद सांगते. 

फळे आणि दुधाचे  मिश्रण असलेले शेक आपण अगदी आवडीने पितो. ते पिणे टाळा. त्याऐवजी सुकामेवा वापरा. 

तसेच पास्तासारखे पदार्थ पूर्ण विरुद्ध आहारात येतात. दुधात भाज्या उकळवल्या जातात तसेच त्यात लसूण घातला जातो. हे मिश्रण चांगले नाही. 

सफरचंद, अननस, पपई ही फळेही दुधासोबत खाऊ नयेत. आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आहार ठरवा. 

Click Here