शरीराचं आरोग्य जपायचं असेल तर आपली दिनचर्या आणि आहार योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे.
आपण दिवसभरात जे खातो त्याचा परिणाम हा थेट आपल्या शरीरावर होत असतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, आहारासोबतच आपण जे विचार करतो त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
अनेकदा नकारात्मक विचार केल्यामुळेही शारीरिक व्याधी जडतात. त्यामुळेच नकारात्मक विचार केल्यामुळे कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात ते पाहुयात.
निगेटिव्ह विचार केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत होते. राग आणि भिती या नकारात्मक गोष्टींमुळे शारीरिक व्याधी जडतात.
दीर्घकाळ तणाव आणि नकारात्मकता यांमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवते.
नकारात्मक स्व-संवादामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होते.