रशियातील १३० शहरं होणार गायब; संशोधनात काय समोर आलं? 

रशिया हा जगातील सगळ्यात मोठा देश. मात्र या देशातील १३० लहान शहरे गायब होऊ शकतात. 

रशिया हा जगातील सगळ्यात मोठा देश आहे. मात्र एका संशोधनात या देशातील १३० लहान शहरे गायब होऊ शकतात असा दावा केला आहे. 

३.४ दशलक्ष लोकसंख्येची ही शहरे चिंताजनक अवस्थेत आहेत. ही शहराती लोकसंख्या वेगाने कमी होत आहे.

गेल्या दशकात, रशियामधील लहान शहरांमधील सुमारे ३ लाख १४ हजार ५०० लोक शहर सोडून गेले आहेत.

उत्तरेकडील कोळसा, धातू आणि लाकूड मिळणाऱ्या शहरांमध्ये अलिकडेच्या काळात वेगानं लोकसंख्या घट झाली आहे.

तज्ञांनी या घटनेसाठी नोकरीची कमतरता आणि मोठ्या शहरांकडे लोकांचे होत असलेले स्थलांतर याला जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. 

ब्रायन्स्क, नोव्हगोरोड, किरोव्ह आणि क्रास्नोयार्स्क प्रदेशातील शहरे ही समस्या अधिक तीव्र आहे.

वेर्खनी टागिल, ट्रुबचेव्हस्क आणि तोरझोक ही शहरं जलद लोकसंख्या घट आणि आर्थिक स्तर घसरल्यामुळं ओस पडत आहेत. 

स्थानिक विकास संसाधनांचा अभाव आणि लहान व्यवसाय बंद पडल्याने लहान शहरांमधील लोकसंध्या घटीचं संकट आणखी बिकट होत आहे.

सरकारनं वेळीच पावलं टाकली नाहीत तर, ही शहरे निर्मनुष्य होण्याची भीती निर्माण झाली आहे.

धोरणकर्त्यांनी लोकांचा मोठ्या शहरांकडील ओघ थांबवण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या समुदायांना पाठिंबा देण्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहिजेत.

Click Here