मुंबई शहरात गुन्हे सर्वात जास्त?
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पहिल्या क्रमांकावर आलीये. पण, हा पहिला क्रमांक गुन्हेगारीशी संबंधित आहे.
एनसीआरबीचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांसंदर्भातील या रिपोर्टमध्ये मुंबई शहर ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात पहिले ठरले.
२०२३ या वर्षात मुंबईमध्ये सर्वाधिक आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये दोन हजार ३९६ गुन्हे एका वर्षात नोंदवले गेले.
ऑनलाईन कागदपत्रात फेरफार करून फसवणूक केल्याचे ४५ गुन्हे घडले आहेत. महिला आणि मुलांवर सोशल मीडियावरून पाळत ठेवल्याचे ११९ गुन्हे दाखल झाले.
सायबर स्टॉकिंगच्या गुन्ह्यात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद या गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर (१६३ गुन्हे) आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून शोषणाच्या गुन्ह्यात बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. बंगळुरूत असे ३७४ गुन्हे घडले आहेत. तर मुंबईमध्ये १७९ गुन्हे घडले होते.