कोण आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड? जाणून घेऊया.
ऋता आव्हाड यांनी पावलोपावली जितेंद्र आव्हाड यांना साथ दिली.
त्या सुरुवातीला एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करत होत्या.
एअर हॉस्टेस झाल्यानंतर त्या एअर इंडिया युनियनमध्येही सहभागी झाल्या होत्या.
जितेंद्र आव्हाड आणि ऋता आव्हाड यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता.
त्यामुळे त्यांच्या लग्नाला घरातील कोणीच उपस्थित नव्हतं.
मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगीही आहे.