नवरात्रीनिमित्त क्रांती रेडकरचं पिवळ्या इरकल साडीत मनमोहक फोटोशूट
अभिनेत्री क्रांती रेडकर हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
क्रांती रेडकरने शारदीय नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
आज नवरात्रौत्सवातील चौथा दिवस आहे. आजचा रंग पिवळा हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
क्रांतीने पिवळ्या रंगाची इरकल साडी नेसून चाहत्यांचं मन जिंकलं.
या साडीत क्रांतीचे सौदर्यं अधिकच खुलून दिसत असल्याने सर्वांनाच तिची भूरळ पडली.
पिवळ्या साडीतील लूकवर क्रांतीने मराठमोळे दागिने परिधान केले आहेत.
अभिनेत्री असण्याबरोबरच क्रांती एक उत्तम दिग्दर्शिका आणि उद्योजिका आहे.
क्रांती इन्स्टाग्रामवरील रील व्हिडीओमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.