पावसाळ्यात नाही, तर राेजच रात्री इथे विजांचा कडकडाट हाेताे. राेजच इथे आकाश विजांच्या प्रकाशाने उजळून जाते.
व्हेनेझुएलामधील Lake Maracaibo परिसरात Catatumbo नदीच्या मुखापाशी राेज रात्री वीजा चमकतात.
वर्षातील जवळपास ३०० रात्री या भागात वीजा कडाडत असतात. याला Eternal Lighting असे म्हणतात.
सातत्याने इतक्या वीजा चमकताना जगात कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे या ठिकाणाला Lightning Capital of the World असं म्हणतात.
या भागात उष्णकटिबंधीय वारा, आर्द्रता आणि पर्वतरांगांच्या रचनेमुळे ढग सतत एकमेकांना धडकतात आणि वीज निर्माण होते.
Catatumbo Lightning शक्तिशाली असल्याने अंतराळातून पण दिसते. खगोलशास्त्रज्ञ याला Natural Lighthouse असं म्हणतात.
या विजांना नैसर्गिक महत्त्व असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ओझोन लेयर टिकवून ठेवण्यासाठी हातभार लागतो, असंही मानलं जातं.
इथे रात्रीच्या आकाशात एकाच वेळी शेकडो विजांचे झोत दिसतात. कधी कधी एका तासात २८० वेळा वीज कडकडते.
रात्री चालणारा हा वीजांचा खेळ वर्षातील २६० ते ३०० दिवस सुरूच असताे. म्हणजेच जवळपास राेजच आकाशात वीजा चमकताना दिसतात.
१७ व्या शतकातल्या युद्धांमध्ये या विजेच्या प्रकाशामुळे सैनिकांनी मार्ग ओळखला, असे सांगण्यात येते.