भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल किती शिकलेत, तुम्हाला माहितीये?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हेरगिरीच्या जगातला खरा 'जेम्स बॉन्ड' म्हटले जाते.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांच्या नावाचीही मोठी चर्चा झाली.
उत्तरखंडच्या पौडी गढवाल येथे जन्मलेल्या अजित डोवाल यांनी अजमेर मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
अजित डोवाल हे केरळमधील १९६८च्या बॅचचे आयपीस अधिकारी आहेत. त्यांनी आपला सर्वाधिक वेळ देशाच्या गुप्तचर विभागात घालवला आहे.
नियुक्तीनंतर चार वर्षात ते इंटेलिजन्स ब्यूरोमध्ये सामील झाले आणि २००५मध्ये संचालक पदावरून निवृत्त झाले.
मल्टी एजन्सी सेंटर आणि जॉईंट इंटेलिजन्स टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतर त्यांना २०१४मध्ये देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले.