नेल आर्ट करण्यापूर्वी एकदा करा विचार
सध्या तरुणींमध्ये क्रेझ आहे ती नेलआर्टची. परंतु, हे नेल आर्ट करतांना जो UV लाइट्सचा वापर करण्यात येतो. तो शरीरासाठी घातक असल्याचं म्हटलं जातं.
जेल नेल पॉलिश, जेल मॅनिक्यूर आणि सॅलॉनमध्ये क्युअरिंग प्रोसेससाठी UV लाइट्सचा वापर केला जातो.
सतत UV लाइट्सचा वापर केल्यामुळे नखांची मूळ रचनेला धक्का बसतो आणि नख पातळ होऊ लागतात.
नखांमध्ये कोरडेपणा येतो आणि नखे हळूहळू तुटू लागतात.
प्रमाणापेक्षा जास्त UV लाइट्सचा वापर केल्यामुळे क्युटिकल्सला इजा होते.
ज्यांची स्कीन सेंसेटिव्ह आहे त्यांना स्कीन इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.