तुम्ही नखातली लहानशी पांढरी चंद्रकोर पाहिली आहे का? नख जिथून सुरू हाेतात, तिथे ती अगदी लहान चंद्रासारखी दिसते.
नखांवर असलेल्या या पांढऱ्या रंगाच्या आकाराला विज्ञानात Lunula म्हणतात. लॅटिनमध्ये Lunula म्हणजे लहान चंद्र.
ही lunula म्हणजे नखाच्या वाढीचं केंद्र. नखाच्या याच भागातूनच नवीन पेशी तयार होतात.
नखं सतत वाढत असतात. lunula ही प्रक्रिया नियंत्रित करत असते.
काही लोकांच्या नखांवर ती मोठी असते. तर काहींवर जवळजवळ दिसतच नाही.
लुनुला दिसली नाही तरी काळजीचं कारण नसतं. शरीर रचनेनुसार प्रत्येकाची वेगळी असते.
मात्र कधी ती अचानक नाहीशी झाली, तर आरोग्य तपासणं गरजेचं ठरतं.
कारण lunula कधी कधी रक्तक्षय, थायरॉईड किंवा इतर आजारांचा इशारा देऊ शकते.
डॉक्टर नेहमी नखं पाहून आरोग्य तपासतात. नखं शरीराचं hidden report card आहे.