कालसर्प दोष मुक्तीसाठी नागपंचमीला शिवलिंगवर 'या' गोष्टी करा अर्पण 

हिंदू पंचांगानुसार श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात येते. 

हिंदू पंचांगानुसार श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात येते. या तिथीला भगवान शिवजींचे आभूषण नागाची पूजा केली जाते. 

नागाची पूजा केल्यानंतर आध्यात्मिक शक्ती, सिद्धी, धन यांची प्राप्ती होते अशी धारणा आहे. 

तसेच कुंडलीमधील राहू-केतू यांची स्थिती चांगली नसेल तर नागपंचमीला नागांची विशेष पूजा केल्यावर लाभ होतो अशी देखील मान्यता आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार नाग पंचमी दिवशी शिवलिंगवर काही खास गोष्टी अर्पण करायच्या असतात. त्यामुळं काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. 

नागपंचमी दिवशी शिवलिंगवर मध अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. यामुळं कौटुंबिक कलह आणि शनी दोष कमी होतो. 

नागपंचमीला शिवलिंगवर धोत्रा (धतूरा) अर्पण केल्यानं आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. भगवान शिव यांची कृपादृष्टी राहते. 

शिवलिंगवर नागपंचमीदिवशी दूधाचा अभिषेक करणं देखील शुभ असतं. ब्रम्ह मुहूर्तावर शिवलिंगवर दूग्धाभिषेक केला तर अनेक लाभ मिळतात. 

नागपंचमी दिवशी शिवलिंगवर अक्षता आणि चंदन अर्पण केल्यानं जीवनात सकारात्मकता वाढते अशी धारणा आहे. 

Click Here