Mutual Funds: रिस्क नको रे बाबा... 

लोकांनी घटवली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

आर्थिक चिंता, शेअर बाजाराची खुंटलेली वाढ, नफेखोरी यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये मे महिन्यातील गुंतवणूक तब्बल २२ टक्क्यांनी घसरून १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. 

मे महिन्यात ही गुंतवणूक १९,०१३ कोटी रुपयांवर आली आहे. मात्र म्युच्युअल फंड उद्योगाकडील ओघ कमी झालेला नाही. यातील एकूण निव्वळ मालमत्ता प्रथमच ७२.२० लाख कोटी रुपयांवर पोहोचली. 

म्युच्युअल फंड उद्योगात मे महिन्यात २९,१०८.३३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे.

म्युच्युअल फंड्ससाठीच्या एसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार, इक्विटी फंडांमध्ये सलग पाचव्या महिन्यात गुंतवणुकीत घट झाली आहे. 

पैसे कोणत्या फंडमधून काढले? इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधून ६७८ कोटी, व्हॅल्यू फंडातून ९२ कोटी, डिव्हिडंड यील्ड फंडातून २१ कोटी, गोल्ड ईटीएफमधून ६ कोटी आणि बॉण्ड/डेब्ट फंडातून १५,९०८ कोटी.

गुंतवणूक का आटली?  १. शेअर बाजारातील अस्थिरता. २. नफावसुली करण्याकडे कल. ३. जागतिक आर्थिक अस्थिरता

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत एसआयपीचा मोठा वाटा असून, एसआयपीद्वारे मे महिन्यात यात रेकॉर्ड २६,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ती एप्रिलमधील २६,६३२ कोटींपेक्षा अधिक आहे. 

Click Here