जर तुम्हालाही आपल्या मेहनतीची कमाई वाचवून मोठा फंड उभा करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
तुम्ही महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक करून ६० लाखांपर्यंतचा फंड जमवू शकता. यासाठी तुम्हाला एसआयपीची मदत घ्यावी लागेल.
जर तुम्ही २४ वर्षांसाठी ४ हजार रुपये जमा केले, तर तुमची गुंतवणूक ६० लाख रुपये होऊ शकते.
एसआयपीवर मिळणारा सरासरी परतावा १२ टक्क्यांपर्यंत असतो असं तज्ज्ञांचं मत आहे.
यानुसार २४ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ११,५२,००० रुपयांची असेल आणि व्याजापायी तुम्हाला ४८,८१,७१५ रुपये मिळतील.
तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याजाची रक्कम जोडली तर तुमचा एकूण फंड ६०,३३,७१५ रुपये होईल.
टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.