अहमदाबादला फिरायला जाणार असाल, तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!
भारतातील एक प्राचीन शहर अहमदाबाद त्याच्या इतिहास, संस्कृती आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.
साबरमती आश्रमः शांती आणि इतिहासाचे प्रतीक असलेले महात्मा गांधींचे निवासस्थान.
अदलाज की वावः पाच मजली पायऱ्यांची वाव, जी तिच्या अद्भुत कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे.
कांकरिया तलावः एक प्रचंड मोठे तलाव क्षेत्र आहे, जिथे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवू शकतात.
अक्षरधाम मंदिरः भव्य वास्तुकला आणि आध्यात्मिक शांतीचे ठिकाण, अवश्य भेट द्या.
मानेक चौकः दिवसा व्यवसाय केंद्र असलेला मानेक चौक रात्री स्ट्रीट फूडचा केंद्र बनतो.
भद्रा किल्लाः शहराच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचा इतिहास आणि वास्तुकला पाहण्यासारखी आहे.
ऑटो वर्ल्ड व्हिंटेज कार म्युझियमः कार प्रेमींसाठी एक अनोखे संग्रहालय, इथला दुर्मिळ संग्रह नक्की पहा.