छोट्या पडद्यावरील मुरांबा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
या मालिकेतून शिवानी मुंढेकर हे नाव घराघरात पोहोचलं.
मुरांबा मालिकेत रमा म्हणून प्रसिद्ध असलेली शिवानी मुंढेकर सध्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री शिवानी मुंढेकरने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून अभिनेत्रीने लूक केला आहे.
शिवानीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
या फोटोंमध्ये तिने केलेला मराठमोळा लूक तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत आहे.