'बजरंगी भाईजान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा साऱ्यांनाच आठवत असेल.
'मुन्नी' ही व्यक्तिरेखा साकारत हर्षालीने अनेकांची मन जिंकली.
आता हर्षाली खूप बदलली आहे.
हर्षाली आपलं सौंदर्य आणि ग्लॅमरने इंटरनेटचा पारा वाढवत असते.
हर्षाली मोठी झाली असेल पण तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अजूनही कायम आहे.
हर्षाली मल्होत्राला 'बजरंगी भाईजान'साठी साइन केलं, त्यावेळी तिने २ ते ३ लाख रुपये फी घेतली होती.
फार कमी वयात मुन्नी बनून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हर्षालीनं नंतर फारसे सिनेमे केले नाहीत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहिली.
हर्षाली सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतेय. तसेच अभिनयही करतेय. लवकरच ती 'अखंड २: थंडावम' या चित्रपटात दिसणार आहे.