हनिमूनसाठी खास ठिकाण शोधत असाल तर, मुन्नार हे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.
केरळमधील हिल स्टेशन मुन्नार हे तिथल्या चहाच्या बागांसाठी आणि नैसर्गिक समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे.
येथील शांत आणि रोमँटिक वातावरण नवविवाहित जोडप्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
मुन्नारमध्ये एरविकुलम राष्ट्रीय उद्यानासारखी वन्यजीव स्थळे देखील आहेत, जिथे नीलगिरी तहर पाहता येतात.
अटुकल धबधबा आणि लक्कम धबधबा हे इथल्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालतात.
कुंडला तलावासारखे मुन्नारचे शांत तलाव बोटिंग आणि शांततेच्या खास क्षणांसाठी प्रसिद्ध आहेत.
ट्रेकिंग-कॅम्पिंगची आवड असलेले जोडपे अनामुडी पीक आणि मीशापुलीमाला येथे सहलीचा आनंद घेऊ शकतात.
पोथामेडू व्ह्यू पॉइंट आणि टॉप स्टेशन सारखी ठिकाणे सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी परफेक्ट आहेत.
इथल्या वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलांमध्ये सुंदर क्षण घालवा आणि फोटो काढा.