मुंबईत अवतरले जपान? 'चेरी ब्लॉसम'चा व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! कुठे, कसे जायचे...
ठिकाण, तिथे कसे पोहोचावे, तिकीट आहे का, हे जाणून घ्या.
मुंबई म्हणजे धावपळ, गर्दी आणि सिमेंटचे जंगल... पण सध्या मुंबईचे एक वेगळेच रूप सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवे सध्या गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरला असून, जणू काही जपानमधील प्रसिद्ध 'चेरी ब्लॉसम' हंगाम मुंबईत अवतरला की काय, असा भास होत आहे.
इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दुतर्फा असलेल्या 'ताबेबुइया रोजिया' वृक्षांना सध्या बहर आला आहे.
ही झाडे पूर्णपणे गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरून गेली असून, रस्त्यावर फुलांचा सडा पडलेला पाहायला मिळत आहे.
या विलोभनीय दृश्याचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे मुंबईकर आणि निसर्गप्रेमी थक्क झाले आहेत.
नेमकी कोठे पाहायला मिळेल ही दृश्ये? प्रमुख ठिकाण: इस्टर्न एक्सप्रेस हायवे (विक्रोळी ते मुलुंड दरम्यानचा पट्टा).
या वृक्षांना 'पिंक ट्रम्पेट' असेही म्हणतात. दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला या झाडांना बहर येतो.
अनेक मुंबईकर या गुलाबी सौंदर्याचे फोटो काढण्यासाठी आणि रिल्स बनवण्यासाठी हायवेच्या कडेला गर्दी करत आहेत.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस "हे मुंबईतले दृश्य आहे यावर विश्वासच बसत नाही", "मुंबईला जपानसारखा लूक आला आहे", अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.
प्रदूषण आणि ट्रॅफिकच्या गराड्यात मुंबईचे हे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरत आहे.