सॅडविच मेकरमध्ये करता येते स्टफ भेंडी?
स्वयंपाक घरातील काम पटापट व्हावीत यासाठी बाजारात अनेक नवीन प्रोडक्ट आले आहेत. यातलंच एक प्रोडक्ट म्हणजे सँडविच मेकर.
साधारणपणे सँडविच मेकरमध्ये फक्त सँडविचच केले जातात. परंतु, या गॅझेटचा वापर करुन अन्यही काही हटके पदार्थ सहज करता येऊ शकतात.
जर तुम्ही पनीर टिक्का किंवा ग्रील पदार्थ खाण्याचे शौकिन असाल तर इलेक्ट्रिक सँडविच ग्रिलरमध्ये असे पदार्थ सहज करता येऊ शकतात.
स्टफ वांगी किंवा स्टफ भेंडी यांसारख्या भाज्याही सँडविच मेकरमध्ये करता येऊ शकतात. विशेष म्हणजे कमी तेलात हे पदार्थ होतात.
जर तुम्हाला वॅफल खायची इच्छा झालीये आणि घरी वॅफल मेकर मशीन नाहीये. तर सरळ सँडविच मेकरमध्ये तुम्ही वॅफल सुद्धा करु शकता.
बेसन चीला सुद्धा सँडविच मेकरमध्ये करता येतो.