हताश, निराश क्षणी
'हे' वाचा!

गुरु श्री. श्री. रविशंकर यांनी सांगितलेले सुविचार आयुष्य सुंदर बनवणारे सिद्ध मंत्र आहेत. हताश क्षणी त्या विचारांची उजळणी करा. 

देवाच्या अस्तित्त्वावर शंका घेण्यापेक्षा तो आहे ही खूणगाठ मनाशी बांधून कामाला लागा, त्याची प्रचिती आपोआप येईल. 

सत्कर्म करणाऱ्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते, कारण कोणी दखल घेवो न घेवो, देव आपली दखल घेणार हे त्याला माहित असते. 

अज्ञान तुम्हाला नैराश्यात लोटते तर ज्ञान तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते, म्हणून ज्ञानाची कास धरा. 

मन अशांत असेल तेव्हा ध्यान करा. ध्यान म्हणजे विचारांवर नाही तर श्वासांवर लक्ष केंद्रित करा, विचार आपोआप निवळतील. 

लोकांचा माणुसकीवर विश्वास कायम राहावा यासाठी स्वतः माणुसकीचे उत्तम उदाहरण बना. 

संकटाला आपल्या जीवनातील नवीन कार्याची एक संधी म्हणून पाहा.

अपयशाने खचून न जाता तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, एक ना एक दिवस यश तुम्हाला मिळणारच!

आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष देऊन मिळालेल्या गोष्टींबद्दल देवाचे आभार माना, नैराश्य तुमच्याकडे फिरकणार नाही. 

Click Here