मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
अनेक लोक सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालण्यासाठी बाहेर पडतात.
मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी फायदेशीर असतो, पण यामध्ये काही सामान्य चुका केल्यास त्याचे फायदे कमी होतात किंवा त्रासदायक ठरू शकतात.
चुकीच्या प्रकारचे किंवा जुने बूट वापरल्यास पायात वेदना, दुखापत किंवा गुडघेदुखी होऊ शकते.
चालण्याआधी आणि नंतर पाणी न पिल्यास डिहायड्रेशन होऊ शकतो.
रिकामं पोट फार वेळाने चालणं चक्कर येण्याचं कारण ठरू शकतं. दुसरीकडे, जास्त खाऊन चालल्यास जडपणा आणि अपचन होऊ शकते.
थोडा वेळ हलकं चालून नंतर वेग वाढवणं महत्त्वाचं असतं.
मॉर्निंग वॉक करताना फोनचा वापर शक्यतो टाळावा. यामुळे मन विचलित होतं.
मॉर्निंग वॉक योग्य पद्धतीने केला तरच त्याचा फायदा होतो.