तुम्हालाही सकाळी उठल्यावर शिंका येत असतील तर करा सोपे उपाय
अनेकांना सकाळी उठल्या उठल्या अचानकपणे शिंका येऊ लागतात. काही जण याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर अशा शिंका येत असतील तर पाच सोपे घरगुती उपाय पाहुयात. ज्यामुळे हा त्रास कमी होईल.
अनेकांना धुळीची अॅलर्जी असते. ज्यामुळे सतत शिंका येतात. त्यामुळे नियमितपणे आठवड्यातून एकदा उशी, गादीचे कव्हर, बेडशीट आणि चादर धुवत जा.
२ दिवसातून एकदा गरम पाण्याची वाफ घ्या. ज्यामुळे नाकातील अडथळे, अॅलर्जी बाहेर पडण्यास मदत मिळेल.
घरातील हवा खेळती ठेवा. तसंच हवा स्वच्छ राहण्यासाठी ह्युमिडीफायर लावा. ज्यामुळे हवेतील धुलीकण निघून जातील.
सकाळी उठल्यावर प्राणायाम करा. यामुळे श्वासोच्छवासाची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आहारात व्हिटामिन सी असलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा.