भारताचा मोहम्मद शमी होता टॉपर, पण आता...
ICC च्या फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मिचेल स्टार्कच्या नावे आहे. त्याने ६ डावात ११ विकेट्स घेतल्या आहेत.
आयसीसी फायनलमध्ये मोहम्मद शमीनं ६ डावात १० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. २०२१ च्या WTC फायनलमध्ये शमीनं ४ विकेट्स घेतल्या होत्या.
न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. २०१५ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरीसह ५ डावात त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आयसीसीच्या फायनलमध्ये १० डावात ८ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
न्यूझीलंडच्या ताफ्यातील कायले जेमिसन याने ICC च्या फायनलमध्ये ३ डावात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ग्लेन मॅग्रानं ICC फायनलमध्ये ५ डावात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
आर. अश्विन या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने ५ डावात ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने ICC च्या फायनलमध्ये ५ डावात ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.