सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया वेगवान करण्याची योजना आखत आहे.
मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSB) शेअर्समध्ये ४% पेक्षा जास्त वाढ झाली. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्सची किंमत ४% वाढून प्रति शेअर ₹३८.९९ झाली.
तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सची किंमत २.६८% वाढून ₹३९.०० वर आली झाली. युको बँकेच्या शेअर्सची किंमत २.७% वाढून ₹३२.१४ झाली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्सची किंमत २.८% वाढून ₹५६.१५ झाली. दरम्यान, पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्सची किंमत ३.४% वाढून ₹३२.३० वर आली.
सीएनबीसी आवाजच्या वृत्तानुसार, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया वेगवान करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये मर्चंट बँकर्सची नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे.
केंद्र सरकार पुढील सहा महिन्यांत क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट आणि ओएफएसद्वारे पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील २०% पर्यंत हिस्सा विकण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
प्रस्तावित भागविक्रीमध्ये युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँक यांचा समावेश असेल.