पालेभाज्या शिजवतांना काही किरकोळ चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
हेल्दी रहायचं असेल तर आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. पालेभाज्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल्स यांचं प्रमाण पुरेपूर असतं.
पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारे आहारात समाविष्ट करता येऊ शकतात. यात काही जण कच्चा पालेभाज्या खातात. तर, काही जण शिजवून खाणं पसंत करतात.
पालेभाज्या शिजवतांना काही किरकोळ चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे. या चुकांमुळे त्यातील पोषकतत्व कमी होतात.
पालेभाजी करण्यापूर्वी तिला ब्लॉन्च करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जण ही स्टेप स्किप करतात. परंतु, तसं करु नका. भाजी ब्लॉन्च केल्यामुळे तिचा रंग, चव, टेक्सचर आणि पोषक तत्व कायम राहतात.
पालेभाजी शिजवतांना कधीही जास्त पाण्याचा वापर करु नका. यामुळे पोषकमूल्य नष्ट होतात. भाजी केवळ पाण्यात बुडेल इतकच पाणी त्यात टाका. जास्त नको.
पालेभाजी कधीही ओव्हरकूक करु नका. यामुळे तिच्या चवीमध्ये फरक पडतो. आणि, तिचा रंग बदलून काळसर दिसायला लागतो.
भाजीची खरी चव तिच्यात घालण्यात येणाऱ्या मसाल्यांवर अवलंबून असते. जर मसाले कमी जास्त झाले तर भाजीची चव बिघडते. त्यामुळे योग्य प्रमाणात मसाले वापरा.
तुळशीच्या मंजिरांमुळे कमी करा शरीरातील एक्स्ट्रा फॅट