वातावरण बदललं की लहान मुलांना लगेच सर्दी, खोकला होतो. त्याच्यासोबतच तापही येतो.
मुलांना ताप आल्यावर सहाजिकच कुटुंबीय त्यांची काळजी घेतात. परंतु, अनेकदा पालकांची ही काळजीच मुलांना त्रासदायक ठरते.
आज अशा काही गोष्टी पाहुयात ज्या मुलांना ताप आल्यानंतर पालकांनी अजिबात करु नये.
साधारणपणे मुलांना ताप आल्यावर आपण एसी किंवा फॅन बंद करतो. परंतु, तसं करु नये.
मुळात तापामुळे आधीच मुलांच्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं. त्यात फॅन बंद केल्यामुळे मुलांना आणखी गरम होतं आणि शरीराचं तापमानही वाढतं. परिणामी, ताप वाढतो.
ताप आल्यावर मुलांना थंडी वाजते असा अनेकांचा समज आहे. परंतु, हा गैरसमज बाळगून मुलांच्या अंगावर एक्स्ट्रा चादरी टाकू नका.
अंगावर जास्त चादरी असल्यामुळे मुलांच्या शरीरातील उष्णता बाहेर पडायला अडथळा येतो.
ताप आल्यावर मुलांना जर भूक नसेल तर त्यांना जबरदस्त भरवण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मुलांची जेवणावरची इच्छा कमी होऊ शकते.
ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर खाऊ नका चिया सिड्स, नाहीतर....