उन्हाळ्यात पुदिना ठरेल वरदान, पाहा ८ भन्नाट फायदे...

उकाड्यापासून पचनाच्या समस्यांपर्यंत पुदिना कसा फायदेशीर ठरतो, पाहा त्याचे ८ भन्नाट उपयोग...

पुदिन्याच्या पानांचे ८ जादूई उपयोग... 

पुदिन्याची पाने चावून खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी कमी होते हे नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून काम करते.

अपचन, मळमळ किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्यांवर पुदिना अत्यंत गुणकारी आहे. पुदिन्याची पान खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

पुदिन्याचा सुगंध मनाला शांती देतो. पुदिन्याचा चहा किंवा त्याच्या अर्काचा वास घेतल्याने मानसिक तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

पुदिन्याचा तीव्र वास डास आणि इतर कीटकांना दूर ठेवतो. पुदिन्याची पाने त्वचेवर चोळल्याने डासांपासून संरक्षण मिळू शकते.

सॅलॅड, रिफ्रेशिंग ड्रिंक्स आणि डेझर्टमध्ये पुदिन्याचा वापर केल्यास पदार्थाला एक वेगळीच आणि रिफ्रेशिंग टेस्ट मिळते.

त्वचेवर खाज येणे किंवा मुरुम असल्यास पुदिन्याच्या पानांची पेस्ट लावल्याने आराम मिळतो. यातील थंडाव्यामुळे त्वचा शांत होते.

डोकेदुखी होत असल्यास पुदिन्याची पाने कपाळावर चोळावीत किंवा पुदिन्याच्या तेलाचा वास घ्यावा. यामुळे झटपट आराम मिळतो.

पुदिन्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

Click Here