मायग्रेनमुळे प्रचंड डोकं दुखतंय? करा हे सोपे उपाय

सध्याच्या काळात अनेक जण मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त आहेत.

बदलती जीवनशैली, चुकीची आहार पद्धती याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. सध्याच्या काळात अनेक जण मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त आहेत.

मायग्रेनमुळे डोकं दुखायला लागलं तर त्या वेदना सहन करण्यापलिकडे जातात. म्हणूनच, या त्रासातून तात्काळ आराम मिळण्यासाठी काही उपाय पाहुयात.

डोक दुखायला लागल्यावर कपाळावर पुदिन्याच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा.

डोकेदुखी थांबवण्यासाठी नाकात गाईच्या तुपाचे २ ते ३ थेंब टाका. यामुळे शरीरातील पित्त संतुलित करण्यास मदत मिळते.

आल्याचा चहा घेतल्यामुळेही डोकेदुखीचा त्रास कमी होतो. तसंच मळमळ, उलट्या होत असतील तर त्यातही आराम मिळतो.

लिंबाच्या सालीची पेस्ट कपाळावर लावल्यामुळेही डोकेदुखी कमी होते.

सफरचंदामुळे होईल कर्करोगाचा धोका कमी!

Click Here