डशिंग दिसायचंय? मग प्रत्येक पुरुषाकडे हवी 'ही' मेटल ज्वेलरी
आता डॅशिंग लूक मिळवा सहज!
दागिना म्हटलं की सहाजिकचं स्त्रियांचे दागिनेच डोळ्यासमोर येतात. परंतु, सध्या काळानुसार प्रत्येकाची स्टाइल स्टेटमेंट चेंज होत आहे.
आजकाल मुलींप्रमाणेच मुलंदेखील नवीनवीन अॅक्सेसरीज, ज्वेलरी ट्राय करत असतात. म्हणूनच, मुलांना डॅशिंग लूक करायचा असेल तर त्यांच्याकडे मेटल ज्वेलरी असलीच पाहिजे.
सध्या कॉलेजच्या मुलांमध्ये स्लीक ब्रेसलेट चांगलंच ट्रेंड होतंय. साधा टी-शर्ट आणि जीन्स यांसारख्या कॅज्युअल लूकवर स्लीक ब्रेसलेट उठून दिसतं.
जर तुम्हाला कूल दिसायचं असेल तर तुम्ही स्टेटमेंट रिंगही ट्राय करु शकता. कॅज्युअल किंवा फॉर्मल यांसारख्या दोन्ही लूकवर ही रिंग शोभून दिसते.
मिनिमल नेक चेन ही तुमच्या लूकमधली गेम चेंजर ठरु शकते. ओपन-कॉलर शर्ट किंवा स्वेटरवर तुम्ही ही ट्राय करु शकता.
सोन्याची किंवा चांदीची सिंगल रिंग सुद्धा तुम्ही कानात घालू शकता.
मध खाण्याचे अफलातून फायदे,शारीरिक तक्रारीही होतील दूर