अनेकदा लोक डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.
डिप्रेशन हा शब्द कितीही लहान वाटला तरी त्याचा अर्थ खूप मोठा आहे. अनेकदा लोक डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.
डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आणि विचारांमध्ये काही बदल करणे गरजेचं आहे. ज्यामुळे मानसिक आजारावर आपण सहज विजय मिळवू शकतो.
डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मनात सतत निगेटिव्ह विचार येतात. मात्र, यातूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत रहा. आजुबाजूच्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.
ज्यावेळी तुम्ही मानसिक विचारांमध्ये गुंतत जाता त्यावेळी एखादा छंद जोपासा. ज्यामुळे त्यात तुम्ही गुंतून जाल. आणि, अन्य नकारात्मक विचार करायला वेळ मिळणार नाही.
पुस्तके वाचा. यामुळे तुमचं मन रमेल. सोबतच तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायची प्रेरणाही मिळेल.
कम्फर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा. जोपर्यंत कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन विचार करु शकणार नाही.
कोणतीही गोष्ट मनात दडवून ठेवण्यापेक्षा ती व्यक्त करायला शिका. तुम्हाला इतरांशी बोलायला जमत नसेल तर मग डायरीमध्ये या गोष्टी लिहा. पण, व्यक्त व्हा.