मेनस्ट्रुअल कप वापरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
मासिक पाळीतील त्रास कमी व्हावा यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या गोष्टी, पर्याय उपलब्ध आहेत.
मासिक पाळीदरम्यान अनेक स्त्रिया मेनस्ट्रुअल कपचा वापर करतात. परंतु, हा कप वापरतांना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
मेनस्ट्रुअल कप निवडता आपलं वय, पाळीचा प्रवाह आणि प्रसूतीचा अनुभव या सगळ्याचा विचार करुन निवडा.
मेनस्ट्रुअल कप वापरतांना शरीर शक्य तितकं रिलॅक्स ठेवा. तसंच योग्य पोझिशनची निवड करा. ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.
कप वापरतांना C-फोल्ड किंवा पंच-डाउन फोल्ड यापैकी जे टेक्निक सोयीचं वाटतं ते वापरा.
एकदा कप घातल्यानंतर तो व्यवस्थित उघडला आहे का आणि सील बसलं आहे का ते हाताने चेक करा. तसंच कप काढतांना एकदम ओढू नका.
साधारण ८ ते १० तासांनी कप रिकामा करावा. कप स्वच्छ करतांना कायम पाण्याचा वापर करा. साबण, सुगंधी क्लिनर यांसारख्या गोष्टींचा वापर करु नका.