रुईचं झाडं औषधी गुणांनी युक्त असून त्याचे अनेक फायदे आहेत.
आजकालच्या मुलांना रुईचं झाडं कोणतं हे फारसं माहित नसेल. कारण, अनेकदा जंगली किंवा रानटी झाडं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
रुईचं झाडं शक्यतो माळरानावर उगवतांना दिसून येतं. हे झाडं औषधी गुणांनी युक्त असून त्याचे अनेक फायदे आहेत.
हातामध्ये किंवा पायात काटा रुतला असेल तर त्या जागी रुईच्या पानांचा चिक लावावा. यामुळे थोड्या वेळाने काटा आपोआप बाहेर येतो.
कान दुखत असेल तर रुईच्या पानाला तूप लावून ते पान गरम करावं. त्यानंतर या पानाचा रस काढावं व कानात टाकावा. २ ते ३ वेळा हा प्रयोग करावा. कानदुखी बरी होते.
शरीरावर कुठे मुक्कामार लागला असेल तर तिथे रुईचं पान गरम करुन त्या पानाने शेक द्यावा.
छातीत कफ झाला असेल तर रुईच्या पानाचा शेक द्यावा.
मधुमेही व्यक्तींची शुगर हाय झाली असेल तर पायांच्या तळव्यांना रुईची पाने बांधावीत. ४ तासानंतर ही पाने काढावित. यामुळे शुगर आटोक्यात येते.