झेंडूचं फूल आहे गुणकारी, त्वचारोगासारख्या अनेक समस्या होतील दूर
देवाला प्रिय असणारं हे फूल आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे.
सणवार आले की प्रत्येकाच्या दारावर झेंडूच्या फुलांची तोरणं दिसून येतात.
देवपूजेमध्येही झेंडूची फुलं आवर्जुन वापरली जातात. विशेष म्हणजे देवाला प्रिय असणारं हे फूल आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे.
झेंडूच्या फुलात, मुळात आणि पानांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात मदत करतात.
शरीरावर डाग, खाज किंवा नायटा झाला असेल तर झेंडूची फूल वाटून त्यात झेंडूच्या पानांचा रस मिक्स करा. तयार झालेली ही पेस्ट प्रभावित जागेवर लावा.
झेंडूची फुले तापातही फायदेशीर ठरतात. ताप किंवा खोकला झाला असेल तर झेंडूची फुलं पाण्यात उकळा. हे पाणी गार झाल्यावर प्या.
स्त्रियांना श्वेत प्रदाराची समस्या असल्यास झेंडूच्या फुलांचा रस घ्यावा. (टीप : वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)