आजकाल सोशल मीडियावर कलाकारांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात.
सोशल मीडियावर सध्या मराठी कलाविश्वातील दोन अभिनेत्रींच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
हा फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत असून या दोन चिमुकल्या कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
फोटोत दिसणाऱ्या या चिमुरड्या खऱ्या आयुष्यात सख्ख्या बहिणी आहेत. या दोघीही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
फोटोतील या चिमुकल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे आहेत. त्यांच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तितीक्षाने 'सरस्वती', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
तर खुशबू 'सारं काही तिच्यासाठी', 'आम्ही दोघी' या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.