स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.
या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे 'मुक्ता' नावाची भूमिका साकारते आहे.
तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.
सध्या स्वरदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
नुकतंच अभिनेत्रीने नवऱ्याबरोबर रोमॅन्टिक अंदाजात फोटोशूट केलं आहे.
"Mr & Mrs Raut...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
स्वरदाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.