सायली देवधर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नाची बेडी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने साकारलेली सिंधू नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
दरम्यान, सायली देवधर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतंच तिने वाईन रंगाची साडी नेसून खास फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
सध्या सोशल मीडियावर सायली देवधरच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे.
नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.