अभिनेत्री रेवती लेले हे मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध नाव आहे.
'स्वामिनी' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
परंतु,'लग्नाची बेडी' मालिकेमुळे रेवती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली मधुराणी प्रेक्षकांना भावली.
सध्या ही अभिनेत्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आहे.
नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
या फोटोंमध्ये रेवती कमालीची सुंदर दिसते आहे.