'रंग माझा वेगळा' या मालिकेतून अभिनेत्री अनघा भगरे नावारुपाला आली.
या मालिकेने जवळपास चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
'रंग माझा वेगळा' मालिकेत तिने श्वेता नावाचं खलनायिकी पात्र साकारलं होतं.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फिकट निळ्या रंगाची साडी नेसून अनघाने सुंदर अंदाजात फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अनघा या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.