वल्लरी विराज ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या माध्यमातून ती नावारुपाला आली.
या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारली आहे.
तिने साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
वल्लरी विराज सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर खास मराठमोळ्या अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
"का प्रीत वेडी लाजते", असं कॅप्शन वल्लरीने या पोस्टला दिलं आहे. अभिनेत्री या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.