'मुरांबा' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर.
या मालिकेत तिने साकारलेल्या 'रमा' नावाच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही नायिका सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
या फोटोशूटसाठी शिवानीने तपकिरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
तसेच केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा माळून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.
शिवानी या लूकमध्ये अतिशय देखणी आणि सुंदर दिसतेय.