दिव्या पुगावकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
'मुलगी झाली हो' या मालिकेतून तिने मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं.
या मालिकेत तिने माऊची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
सध्या ही अभिनेत्री लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवी नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.
दिव्या तिच्या अभिनयासह सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
नुकतंच तिने फिकट गुलाबी रंगाचा गाऊन परिधान करुन सुंदर फोटोशूट केलं आहे.
दिव्याचा हा प्रिन्सेस लूक नेटकऱ्यांना फारच आवडला आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.