एका अपघातानंतर बदललं अभिनेत्रीचं आयुष्य



अक्षया हिंदळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'तुझ्या इश्काचा नादखुळा', पुन्हा कर्तव्य आहे यांसारख्या मालिकांमध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसली. 

अक्षयाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली. परंतु, तिचा हा प्रवास फार सोपा नव्हता. 

एका अपघातानंतर पायाला दुखापत झाल्याने जवळपास दीड वर्ष ती चालू शकत नव्हती. अनेक मालिका तिच्या हातातून गेल्या.

त्यामुळे अक्षया डिप्रेशनमध्ये गेली होती. कारण हातातून काम गेलं होतं. एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला होता.

त्या अपघाताने आपल्याला खूप काही शिकवलं. तसंच त्यानंतर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला. 

"आज मी जी काही आहे हा सगळा त्या अपघाताचा परिणाम आहे."त्यानंतर आपलं आयुष्य बदललं असंही तिने सांगितलं. 

सध्याच्या घडीला अक्षया हिंदळकर ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. 

Click Here