गौरी कुलकर्णी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' मालिकेच्या माध्यमातून गौरी कुलकर्णीला घराघरात एक वेगळी ओळख मिळाली.
यापूर्वी ती 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेत झळकली होती.
गौरी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती फार सुंदर दिसते आहे.
नेटकऱ्यांनी गौरीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.