वैदेही परशुरामी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वैदेहीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.
'सिम्बा', 'इंडियन पोलीस फोर्स' अशा कलाकृतींमधून वैदेहीने बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर वैदेहीची तगडी फॅन फॉलोइंग असून त्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
वैदेहीने एका फॅशन वीकसाठी हा खास लूक केला होता.
या फोटोंमध्ये तिने सोनरी रंगाचा लेहेंगा त्यावर साजेसे दागिने परिधान केले आहेत. वैदेही या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.