मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
अमृताने आपल्या दमदार अभिनयासह नृत्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी साडी, केसात कमळाचं फूल माळून अभिनेत्रीने खास लूक केला आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
"सादगी...", असं कॅप्शन अमृताने तिच्या या फोटोंना दिलं आहे.