लालबागची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी सिनेसृष्टी!


कोण आहे 'ही' अभिनेत्री?

अभिनयाच्या चंदेरी दुनियेत स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण करायचं असेल तर संघर्ष कोणाला चुकलेला नाही.

अनेकांनी अपार कष्ट करत लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. 

अशीच एक मुंबईतील लालबागची मराठी मुलगी जी सिनेरसिकांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. 

या अभिनेत्रीचं नाव हृता दुर्गुळे आहे. 

अलिकडेच एका मुलाखतीत हृताने तिचा जन्म हा लालबागमध्ये झाला असल्याचं सांगितलं.

सध्या मराठी मनोरंजनविश्वात हृता दुर्गुळेच्या आरपार सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. 

या सिनेमातील हृता आणि ललितची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

बॉलिवूडची परमसुंदरी! 

Click Here