मराठी अभिनेत्रीचं बागा बीचवर फोटोशूट
गोवा म्हटलं की बीच फोटोशूट आलंच. मराठी अभिनेत्री विजया बाबरने प्रसिद्ध बागा बीचवरील फोटो नुकतेच शेअर केलेत
व्हाईट क्रॉप टॉप आणि पोल्का डॉट स्कर्ट यात ती सुंदर दिसत आहे
विजयाने कातिल पोज देत पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे
अलीकडेच विजयाची प्रमुख भूमिका असलेल्या बयो मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. विजयाने साकारलेली बयोची भूमिका चाहत्यांना आवडली.
विजयाने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षात मराठी मालिकाविश्वात तिच्या अभिनयाने दबदबा निर्माण करुन चाहत्यांचं प्रेम मिळवलंय.
जय जय स्वामी समर्थ मालिकेत विजयाने साकारलेली चंदाची भूमिका चांगलीच गाजली.