मनोरंजनसृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या रेशीमगाठी सेटवरच जुळल्या.
अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील मालिकेच्या शूटिंगदरम्यानच अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या प्रेमात पडली होती.
तितीक्षा आणि सिद्धार्थने गेल्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
'तू अशी जवळी राहा' मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
तितीक्षाने 'सरस्वती', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकांमध्ये काम केलं आहे.
तर सिद्धार्थदेखील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.