तेजस्विनी लोणारी ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
‘गुलदस्ता’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘अफलातून’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
गेली कित्येक वर्ष मनोरंजनविश्वात कार्यरत असलेल्या तेजस्विनीला ‘बिग बॉस’मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
तेजस्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाची साडी, त्यावर साजेसे दागिने परिधान करुन तेजस्विनीने साजशृंगार केला आहे. अभिनेत्री या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.