स्पृहा जोशी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग देखील आहे.
स्पृहा इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे, तिच्या फोटोंवर कायमच चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
नुकतंच स्पृहा जोशीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं आहे.
पिवळ्या रंगाची साडी, केसात गुलाब आणि साजेसे दागिने परिधान करुन तिने साजशृंगार केला आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.